
सोनगाव येथे दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
खेड : तालुक्यातील सोनगाव बौद्धवाडीनजीकच्या जंगलमय भागात गावठी हातभट्टीची व विदेशी दारूची चोरट्या पध्दतीने विक्री सुरू होती. ही माहिती पोलिसांना मिळताच रविवार दि. 4 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 7 हजार 420 रुपयांच्या विदेशी व हातभट्टीच्या दारूचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विलास मोहिते (वय 39 , रा. सोनगाव बौद्धवाडी, खेड) हा अवैध मद्यविक्री करत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई राहूल कोरे यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.