
संगमेश्वर तालुक्यातील युवा नेतृत्व, रेल्वे मॅन आणि सामाजिक कार्याने आपली ओळख निर्माण करणारे पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्कार जाहीर!
स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे सातत्य पुर्ण सामाजिक कार्यासाठी पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे. संदेश जिमन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून संदेश जिमन हे संगमेश्वर रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधा,
गाड्यांचे थांबे, स्वच्छता यासाठी पाठपुरावा करीत आहेत. केवळ एवढ्यावर समाधान न मानता काम पुर्ण होईपर्यंत त्यांना उसंत नसते. सार्वजनिक सोयीसाठी ते कायम झटत असतात . त्यांची संघटना निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप ही सातत्याने प्रयत्नशील, क्रियाशील असते.
विशेषतः नेत्रावती एक्सप्रेस चा संगमेश्वर थांबा मिळविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून या कामामुळे त्यांची संगमेश्वरमध्ये “रेल्वे मॅन” म्हणून विशेष ओळख निर्माण झाली आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून जन आंदोलन, उपोषण, कोकण रेल्वेचे अधिकारी, खासदार,आमदार, रेल्वे मंत्री, यांच्या भेटीगाठी घेतल्या.
त्यांच्या या लोकाभिमुख आणि जन हितकारी कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाने त्यांना “कोकण रत्न” सन्मानासाठी निवड केली आहे.
शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे.
संदेश जिमन यांच्या या सन्मानामुळे संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक, प्रवासी वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




