कोल्ड स्टोअरेजच्या टेरेसवर पत्रे चढवत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू

0
164

रत्नागिरी शहरातील काद्री आईस ऍण्ड कोल्ड स्टोअरेज या फॅक्टरीच्या टेरेसवर पफ पॅनेल टेरेसवर नेत असतान एमएसईबीच्या वायरला त्याचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून इम्रान अबू बासर हसन (२०) रा. प. बंगाल, सध्या पेठकिल्ला रत्नागिरी, याचा मृत्यू झाला. यातील इम्रान हा आईस ऍण्ड कोल्ड स्टोअरेज या फॅक्टरीत वीस फूटी कॉकपॅनल दोरीच्या सहाय्याने फॅक्टरीच्या टेरेसवर खेचत होता. कॉक पॅनललला ऍल्युमिनियमचा पत्रा असल्याने सदरचा पफ बॅनेल फॅक्टरीच्या टेरेसच्या बाजूला असलेल्या १० फूट अंतरावर असलेल्या एमएसईबीच्या वायरला स्पर्श झाला त्यामुळे इम्रान याला शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता मृत घोषित करण्यात आले. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here