
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे बेशुध्दावस्थेत आढळलेल्या वृध्दाचा मृत्यू
रत्नागिरी : रेल्वेस्टेशन येथे बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 3.30 वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजित मधुसूदन पुनाळे (65, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. टेकाडे यांनी खबर दिली आहे. त्यानुसार,28 ऑगस्ट रोजी दोन्ही पायातील अशक्तपणामुळे आजारी असल्याने ते रेल्वे स्टेशन येथे बेशुध्द अवस्थेत आढळून आले होते. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.