रत्नागिरी-कोकणनगर येथे दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर येथे अज्ञात कारणातून दोन गटात मारहाण करण्यात आली आहे. एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 3.30 वा. कालावधीत घडली. शबाना फणसकर, सबा फणसकर, नबिल फणसकर, सिराज वाडकर, नसरीन वाडकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी), तवसुर वाडकर, जासिम वाडकर (दोन्ही रा. कोकणनगर, रत्नागिरी), रईस, सुफियान गुहागरकर, धनू, सलमान अलगी व इतर 3 अशा 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अज्ञात कारणातून संशयितांनी एकमेकांना संगनमताने शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी पाईप आणि हातांच्या थापटांनीही मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.