कशेळी गावात बिबट्याचा गाईवर हल्ला
राजापूर : तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील राजन आगवेकर यांच्या गायीवर बिबट्याने 2 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. सुमारास हल्ला करून ठार केले. याआधीही असे बिबट्याचे हल्ले झाले आहेत. तर पुन्हा एकदा कशेळी गावात बिबट्याचा धुमाकूळ दिसून येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी देखील सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.