55 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत रत्नागिरी उपकेंद्राचे यश.

   राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे पार पडलेल्या 55 व्या युवा महोत्सवाच्या  विभागीय फेरीत  रत्नागिरी उपकेंद्राच्या  मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यात उप परिसरातील 32 विद्यार्थ्यांनी   19 विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये  सहभाग घेतला होता. त्यातील वेस्टर्न व्होकल सोलो प्रकारात प्रथम क्रमांक( तन्मय चव्हाण ) ,  कोलाज मध्ये द्वितीय( टीना हीर्लोस्कर ), वक्तृत्व तृतीय( वेदराज गोसावी ), एकपात्री अभिनय तृतीय( साक्षी चाळके), कथाकथन उत्तेजनार्थ  ( साक्षी चाळके)असे क्रमांक प्राप्त केले.शिक्षक समन्वयक म्हणून प्राध्यापिका आरती दामले यांनी काम पाहिले. उप परिसराचे सहाय्यक कुलसचिव  अभिनंदन बोरगावे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री. निलेश रोकडे तसेच उप परिसराचे प्रभारी संचालक  डॉ. किशोर  सुखटणकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button