रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 9 जणांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी विशेष पुरस्काराला मात्र कात्री लावण्यात आली आहे. पुरस्कार 5 सप्टेंबरच्या अगोदर जाहीर झाले असले तरी त्याचे वितरण शिक्षक दिनी होणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पुरस्कारासाठी जिल्हाभरातून 22 जणांनी प्रस्ताव दाखल केला होता. या सर्वजणांची गेल्या महिन्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. यानंतर त्या मंजुरीसाठी कोकण आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आल्या. गुरूवारी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण अधिकारी वामन जगदाळे, आर. के. कांबळे आदी उपस्थित होते.
पुंडलिक शिंदे (शिपोले, ता. मंडणगड), मुस्ताक तांबे (उर्दु शाळा विसापूर, दापोली), संतोष देवघरकर (कर्जी, ता. खेड), प्रांजली चव्हाण (मांजरेकोंड, ता. चिपळूण), माधवी पाटील ( कुडली नं. 4, ता. गुहागर ), सुनील बोडेकर (हरपुडे नं. 2, ता. संगमेश्वर), दिलीप भांडावले (पावस नालेवठार, रत्नागिरी), मृगया मोरे (कस्तुरबा गांधी विद्यालय, लांजा), लक्ष्मण घाडीगावकर (सागवे कात्रादेवी, राजापूर ) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.