रत्नागिरीतील प्रसिध्द रांगोळी कलाकारांनी साकारले गणपतीपुळे येथे पंधरा फूट बाय दहा फूट रांगोळी द्वारे अष्टविनायक दर्शन
रत्नागिरीतील प्रसिध्द रांगोळी कलाकार राहुल कळंबटे हे आपल्या रांगोळीच्या कलेतून दरवेळी विविध अप्रतिम कलाकृती सादर करीत असतात यावेळी त्यांनी आपले सहकारी किरण राठोड ,राज कांबळे ,रोहन कालकर आदींच्या मदतीने गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे अष्टविनायकाचे दर्शन रांगोळीच्या द्वारे भव्य कलाकृतीद्वारे साकारले आहे या रांगोळीत अष्टविनायकांची विविध रूपे व त्यांची ठिकाणे दाखविली आहेत शिवाय रांगोळीच्या मधोमध प्रसिद्ध असे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्री गजाननाची कलाकृती रांगोळीद्वारे साकारली आहे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ही रांगोळी पूर्ण झाली आदल्या दिवशीपासून ही रांगोळी काढण्यास सुरुवात झाली संपूर्ण रांगोळी पंधरा बाय दहा फूट असून ही रांगोळी साकारण्यासाठी तीस किलो रांगोळीचे साहित्य लागले तसेच या कलाकारांनी एकोणीस तासात ही रांगोळी साकारली आहे गणेश चतुर्दशीच्या पहाटे गणपतीपुळे येथे भाविकांनी गर्दी केली होती त्यांनी या कलाकृतीचे व या कलाकारांचे कौतुक केले आहे
www.konkantoday.com