
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या वर्तक कुटूंबियांनी भ्रष्टाचाराची हंडी फोडणारा बाप्पाचा देखावा साकारला
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या रत्नागिरी येथील कुवारबांव येथे राहणारे, प्रसिद्ध मेकॅनिक संजय वर्तक यांच्या निवासस्थानी भ्रष्टाचाराची हंडी फोडणारा गणपती बाप्पा अवतरला आहे संजय वर्तक आणि कुटुंबियांनी पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही आशा वस्तूंचा उपयोग करून आजपर्यंत श्री गणेश साकारले आहेत. यावर्षीही वर्तक परिवाराने गणपती बाप्पा पर्यावरण पूरक वस्तू पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, वडाच्या पारंब्या, तशाच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला आहे. वर्तक परिवाराने या कलाकृतीतून देशात चाललेला वाढता भ्रष्टाचार,घोटाळे व धर्मावरून चालेले राजकारण या सर्वांवर भक्ती मार्गातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भ्रष्टाचार व धर्माचे राजकारण यामधून होणारी गोरगरीब जनतेची पिळवणूक व महागाई ही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून वर्तक परिवाराचा बाप्पा सर्व धर्मीय लोकांना घेऊन भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहे असा देखावा साकारला आहे
www.konkantoday.com