चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्याबाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये लावण्यात आली आहे.रत्नागिरी प्रशासनाने याबाबत आदेश काढले आहेत. कोकणातील शिक्षकांना चाकरमान्यांचं नियोजन करण्याचं काम दिलं आहे.
राजापूरमधील 850 पैकी 39 शिक्षकांची ड्युटी एसटी आगारात
रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार आहेत. पण, याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षक आहेत. पैकी 39 शिक्षकांची ड्युटी ही राजापूर आगार येथे लावण्यात आली आहे. पण शिक्षक संघटनांनी आता पत्रक देत याबाबत आक्षेप घेतला आहे.
www.konkantoday.com