राज्यातील १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे करोना लसीकरण महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे करोना लसीकरण महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
देशभरातील १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. सध्या राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांशी साधारण ३६ लाख ८७० विद्यार्थी संलग्न आहेत. या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व महाविद्यालयातच लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम योजना जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button