
गणपतीचे डेकोरेशन करीत असताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू
खेड तालुक्यातील आयनी शेरी गांगुर्डेवाडी येथे राहणारा रूपेश जाधव या ३० वर्षीय तरूणाचा गणपतीचे डेकोरेशन करताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील रूपेश जाधव हा आपले घरी डेकोरेशन करीत असताना रात्रौ ८.३० च्या सुमारास फिर्यादीच्या चुलतीने सांगितले की रूपेश याला इलेक्ट्रीकचा शॉक बसला आहे. तेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी गेले असता रूपेश हा मजघरात उपडी पडलेल्या अवस्थेत व त्याचे डाव्या बोटाला इलेक्ट्रीक शॉक बसल्याचे आढळून आला. त्याला उपचारासाठी लोटे येथील परशुराम रूग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. www.konkantoday.com