
खेड न्यायालयाच्या परिसरात महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
खेड : येथील न्यायालयाच्या आवारात असलेल्या मंदिराशेजारी गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेने कसल्या तरी अनेक गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. बेशुद्ध अवस्थेत त्या महिलेला कोर्टातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे. त्या महिलेने हा प्रकार का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.