
खवटी येथे थांबलेल्या एसटीला खासगी बसची पाठीमागून धडक, तीन जखमी
खेड : मुंबई – गोवा महामार्गावरील खवटी येथे बसथांब्यावर थांबलेल्या एसटी बस( एमएच 20 बीएल 3652) ला आयशर कंपनीची खासगी बस (एमएच 12 आरएन 3461) ची पाठीमागून धडक बसली. या अपघातात राजू सुरेश शेलार (रा. आरव, ता. महाबळेश्वर-सिंधी जि. सातारा), रघुनाथ लक्ष्मण जाधव (रा. ता महाबळेश्वर-वळवण, जि. सातारा), संतोष राजाराम मोहोळकर (ता. पाटोदा, जि. बीड) आदी प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवार दि. 31 रोजी सकाळी 11.21 वाजता झाला.
एसटी बस प्रवासी उतरवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबली असता पाठीमागून येणार्या खासगी बसने एसटीला पाठीमागून धडक दिली. हा अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खवटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर घडला दि.31 रोजी सकाळी 11.21 वाजता झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
एसटी चालक परबती साहेबराव ताकमोडे (रा. जलालपूर कर्जत, जि. अहमदनगर) यांनी अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात दिली. दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी खासगी बसचालक बाळू शंकर कोरनुळे (वय 32, रा. हेदवी-पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.