ओला कंपनीतून बोलत असल्याचे सांगून स्कूटर दुरूस्तीपोटी १७ हजार रुपये गुगलपेवरून स्विकारून रत्नागिरीतील एकाची फसवणूक

रत्नागिरी येथील आदर्शवसाहत नगर येथे राहणारे संदीप नांदगांवकर यांची ओला इलेक्ट्रीकल कंपनीच्या स्कूटरच्या दुरूस्तीपोटी १७ हजार ८०६ रुपयांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी संदीप नांदगांवकर यांनी ओला कंपनी पुणे येथून दीड लाख रुपयांना ऑनलाईन इलेक्ट्रीक स्कूटर विकत घेतली होती. सदर स्कूटरचे वायरिंग उंदरांनी कुरतडल्याने ती बंद पडल्याने त्यांनी ओला कंपनीचे केअर सेंटरवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर प्रविण पांडे नावाच्या इसमाचा फोन आला. आम्ही सर्व्हिस सेंटरमधून बोलत असून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण कॉन्टॅक्ट होत नाही असा मेसेज पाठवला होता. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर तुमची स्कूटर आमच्या येथे कामाकरिता पोहोचली असून सदर स्कूटरचा इन्शुरन्स काढला आहे का याची चौकशी केली.
फिर्यादी यांनी इन्शुरन्स असल्याचे सांगितल्यावर प्रविण पांडे या इसमाने तुम्हाला कामाचे पैसे आधी भरायला लागतील आणि त्यानंतर इन्शुरन्सकडे क्लेम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील असे सांगून फिर्यादी नांदगांवकर यांचेकडून लिंक पाठवून गुगलपेद्वारे तीन वेळा वेगवेगळ्या रकमा पाठवून एकूण १७ हजार ८०६ रूपये आपल्या खात्यात भरून घेतले.
दरम्याने ओला कंपनी पुणे यांच्याकडून फिर्यादी यांना परत फोन आला असता त्यांनी तुम्हाला तुमच्या स्कूटरच्या दुरूस्तीपोटी १२ ते १३ हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही ही रक्कम प्रविण पांडे यांना दिल्याचे सांगितले. मात्र कंपनीचे प्रतिनिधी धवल यांनी आमचेकडे प्रविण पांडे नामक कोणीही इसम काम करीत नसल्याचे सांगून कंपनीने कोणतेही पैसे भरण्यास सांगितले नसल्याचे सांगितले. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button