काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांवर चालणारी शिवसेना राज्यातील शिवसैनिकांना राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विचारांचे सोने देणार आहे का? : नामदार दीपक केसरकर यांचा सवाल

रत्नागिरी : शिवसेनेत अंतर्गत उठाव झाल्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत साथ सोडावी असे वाटत नाही. आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांवर सुरू आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा खरा उत्सवच. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर येत होते. आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांवर चालणारी शिवसेना राज्यातील शिवसैनिकांना राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विचारांचे सोने देणार आहे का? असा खोचक टोला शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ना. केसरकर रत्नागिरीत आले होते. शिंदे गटाच्या कार्यकारिणीबरोबर संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. ठाकरे सरकारच्या कालावधीत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रलंबित राहिलेली कामे ना. शिंदे यांनी तत्काळ मार्गी लावली आहेत. ना.शिंदे यांना राज्यभरात सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून बाळासाहेबांच्या विचारांसह जनतेची कामे करण्याचा खरा वारसा ना. शिंदे हेच चालवत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा देशात प्रथमच विक्रमी गर्दीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button