पर्ससीन नेट मासेमारीला गुरुवारपासून होणार प्रारंभ; जिल्ह्यातील 280 पर्ससीन नेट नौका सज्ज

रत्नागिरी : पर्ससीन नेट मासेमारी गुरुवारपासून (1 सप्टेंबर) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील 280 पर्ससीन नेट नौका या मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत. मच्छीमार यंदाचा तरी मोसम चांगला जाईल, या आशेवर आहेत. डिझेल आणि बर्फाचे दर वाढले आहेत. मागील मासेमारीच्या मोसमात मासेमारी करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यामुळे मच्छीमार आधीच आर्थिक अडचणीत होता. त्यात आता नौकांना लागणार्‍या इंधनाचे दर वाढले. परिणामी गुरुवारपासून समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या नौकांमध्ये केवळ 3 ते 4 दिवसांचेच इंधन भरले जात आहे. यापूर्वी ते 8 दिवसांचे भरले जात होते.
आठ दिवसांऐवजी तीन ते चार दिवसांचेच डिझेल भरून नौका मासेमारीसाठी समुद्रात पाठवल्या जाणार आहेत. समुद्रात पकडलेली मासळी टिकून राहावी यासाठी नौकांमध्ये बर्फ भरून नेला जातो. या बर्फाचेही दर वाढल्याने मच्छीमार मासेमारी मोसमाच्या प्रारंभीच मेटाकुटीला आला आहे. नौकांवर काम करणार्‍या खलाशांनी आपले पगार आणि आगाऊ रकमेच्या प्रमाणात वाढ केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button