
चिपळूण, संगमेश्वर, खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; देवरूखमध्ये महावितरणची वीज गायब
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यात अनेक दिवसांनी विजांच्या कडकडाटासह बुधवारी पाऊस पडला. दापोली आणि गुहागर तालुक्यातही जवळपास प्रत्येकी 10 मि. मी. पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचे वातावरण होते. गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. रत्नागिरीसह, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर आगामी दोन दिवस पावसाचा ग्रीन अॅलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या तातडीच्या संदेशानुसार बुधवारी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.