
गणरायाच्या रूपाने ते धावून आले… गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवले
गणपतीपुळे : गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी गणपतीपुळे येथे गणेश मंदिरात राज्यभरातील गणेशभक्त आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास नांदेडमधील एका पर्यटकास समुद्रातून बुडताना वाचविण्यात यश आले आहे.
गणेश चतुर्थी असल्याने श्रीक्षेत्र गणपतीपुळेत गणेश भक्तांची बुधवारी खूप मोठी गर्दी झाली आहे. येथील समुद्रात एका बुडणार्या पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे. गुलशन राठोड असे पर्यटकाचे नाव आहे. तो नांदेडमधील रहिवासी आहे. गुलशन बुडत असताना लोकांनी मदतीसाठी हाक दिली. त्याचवेळी शरद मयेकर यांनी जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात जाऊन गुलशनला वाचवले.
स्थानिक पोलिस कर्मचारी मधुकर सरगर आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.