रत्नागिरी-नाचणे येथील बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक तक्रार आयोगाचा दणका
रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथे
प्लॅट खरेदीचा करार करण्यात आला. मात्र त्यात निकृष्ठ बांधकाम केले आणि ताबा वेळेत दिला नाही. या प्रकरणी रत्नागिरी-नाचणे येथील बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक तक्रार आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांना 9 टक्के व्याजासह स्वीकारलेली रक्कम, नुकसान भरपाई, तक्रार खर्च द्या,असे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बिल्डरला दिले.
अंतिम युक्तीवादानंतर तक्रारदार राहूल जाधव यांना 9 लाख 25 हजार 800, विलास जाधव यांना 9 लाख 21 हजार 931, नितीन जाधव यांना 10 लाख 24 हजार 585, जनार्दन तळपे यांना 10 लाख 21 हजार 262 इतकी रक्कम 1 जानेवारी 2018 पासून तक्रारदार यांनी बिल्डर रक्कम अदा करेपर्यंत 9 टक्के व्याजासह देण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकल्पाची जाहिरात पाहून राहूल जाधव, विलास जाधव, जनार्दन तळपे, नितीन जाधव यांनी बुकिंगची रक्कम देऊन बिल्डरसोबत करार केला होता. बिल्डरने तक्रारदारांना डिसेंबर 2017 पर्यंत प्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले असतानाही अद्याप ताबा दिला नव्हता. तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. तक्रारदारांनी अॅड. मनिष नलावडे यांच्यामार्फत तक्रार आयोगाकडे दाखल केली होती.