
मालगुंड येथील मंदिर फोडणार्या संशयितावर गुन्हा
मालगुंड येथील श्री. मुसळा देवी मंदिर फोडून चोरट्याने 6 हजार रूपये लांबवले. ही घटना बुधवार 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 ते गुरुवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. कालावधीत घडली. याबाबत अमित प्रभाकर मेहंदळे (वय 45, रा. मालगुंड, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तुषार सुभाष पाटील (वय 36, रा. मालगुंड भाटलेवाडी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मंदिराच्या पुढील दरवाजाची कडी-कोयंडी उचकटून मंदिरात प्रवेश केला. दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील नाणी आणि नोटा असा एकूण 6 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कळेकर करत आहेत.