उक्षी धबधब्याजवळ फिरायला आलेल्यांची गाडी फोडून चोरी करणाऱ्यांना जामीन
रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या जिल्ह्यातील पर्यटकाच्या गाडीची काच फोडून गाडीतील 34 हजार रुपये चोरट्याने लंपास केले. चोरीची ही घटना रविवार 28 ऑगस्ट रोजी घडली होती.
याबाबतची फिर्याद निखिल दिलीप कुवेसकर (वय 31, मूळ मिठगवाणे, राजापूर, सध्या गाडीतळ, रत्नागिरी) यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. सागर अनंत गोणबरे (30, रानपाट, गोणबरेवाडी, रत्नागिरी), प्रदीप शशिकांत कळंबटे (33, देवरूख, संगमेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील कुवेसकर हे रानपाट गावी 28 ऑगस्ट रोजी उक्षी धबधब्यावर दुपारच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या उभ्या करुन ठेवलेल्या कारची काच फोडून साईड बॅग, 25 हजार रोख रक्कम आणि इतर असा एकूण 34 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबतची फिर्याद कुवेसकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सागर गोणबरे व प्रदीप कळंबटे यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांची 7 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केल़ी.