
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुलभ व सुखकार होण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुलभ व सुखकार होण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन, आरोग्य प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन, रेल्वे प्रशासन सज्ज झाला आहे.
रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे-पाटील व वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ते कशेडी घाटापर्यंत वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. परतीच्या प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणतेही असुविधा होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस सज्ज आहेत. पनवेल ते कशेडीघाट पर्यंत ३५ अधिकारी व २४६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
चाकरमानी रेल्वे, एसटी बस, खासगी बस, चारचाकी वाहनांचा वापर करतात. रोहा तालुक्यातील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग मुरुड, रोहा, कोलाड, ताम्हाणे मार्गे पुणे, मुरुड, रोहा, वाकण, खोपोली मार्गे पुणे, रोहा नागोठणे मार्गे मुंबई व रोहा अलिबाग हा मार्ग गजबजलेला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चांगल्या पद्धतीने वाहतुकीचे नियोजन केले आहे.
रेल्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३ अधिकारी व ४२ रेल्वे पोलीस तैनात आहेत. रेल्वे पोलिसांनी रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापुर, जिते, आपटा, रसायनी, सोमाटणे या रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांची व सुरक्षेची प्रवासाची जबाबदारी चोख बजावली आहे.
www.konkantoday.com