खेडमध्ये रसायनाचा ड्रम कापताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू
खेड : शहरातील डाक बंगला परिसरातील एका भंगार दुकानात सोमवारी दि. 29 दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव छोटू सोनकर (18, रा. उत्तरप्रदेश) असे आहे. या बाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डाक बंगला परिसरातील वैश्य भवनसमोर असलेल्या भंगाराच्या दुकानात छोटू हा रसायनाचा रिकामा ड्रम दुपारी पावणे तीन वाजणयाच्या सुमारास गॅस कटरने कापत असताना या ड्रममध्ये अचानक स्फोट होऊन छोटू गंभीर जखमी झाला. या स्फोटाचा आवाज ऐकून या परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या छोटूला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या ठिकाणी डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले आणि शविच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.