
महायुतीचे उमेदवार उदय सामंत थेट शेतकऱ्यांच्या भेटीला
सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे .अनेक उमेदवार आपल्या प्रचारासाठी वाडा वाड्यात फिरत आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार उदय सामंत मात्र कुठेही गेले तरी मतदाराची संपर्क साधल्या शिवाय राहत नाहीत. सामंत हे आज रत्नागिरी तालुक्यातील करबुडे रानपाट लाजूळ भागात प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना शेतात काम करणारे शेतकरी दिसले.त्यानी थेट शेतकऱयांशी जाऊन संवाद साधला .सामंत यांनी दाखवलेल्या आपुलकीने शेतकरी व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले .
www.konkantoday.com