गुहागरमध्ये चाकरमान्यांच्या एसटी बसला ट्रॅव्हल्सची धडक; 16 जखमी

0
145

गुहागर शहर : चाकरमान्यांच्या एसटी बसला खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने अपघात घडला आहे. यामध्ये गाडीतील 16 प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. हा अपघात पिंपर-जामसूत रस्त्यावर जामसुत सीमेवर  सोमवारी पहाटे 6.30 च्या दरम्यान झाला.  नालासोपारा येथून गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील घाडेवाडी व मराठवाड्यातील गणेश भक्त चाकरमानी एसटी महामंडळाची स्वतंत्र गाडी करून गावी येत होते. जमसुत पिंपर या मार्गावर जामसुत सीमेवर समोरून येणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सने धडक दिली. चालकाच्या बाजूने धडक दिल्याने झोपेत असलेल्या प्रवाशांना चांगला दणका बसला. या अपघातात उमराठ येथील अन्वी भरत घाडे (वय 3.5), प्रेम भरत घाडे (वय 9), समिका संतोष घाडे (वय 12) या तीन मुलांसह भरत अर्जुन घाडे (40), प्रकाश पांडुरंग घाडे (42), निता नंदकुमार आग्रे  (32), आनंदा धाकु बसणकर (42), अंकिता एकनाथ घाडे (45), महेंद्र महादेव आग्रे (36), संदीप संजिवन पवार (43), सोनल कृष्णा घाडे (27), किशोरी कृष्णा कुळ्ये (29), ज्योती प्रकाश घाडे (35) प्रिया भरत घाडे (30) प्रमिला कृष्णा घाडे (55), धीरज राजाराम घाडे (30) जखमी झाले. या सर्वांना तातडीने हेदवीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांच्यावर  प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत कदम आणि त्यांच्या चमूने उपचार केले.  जखमींपैकी नीता आग्रे, संदीप पवार, आनंदा बसणकर या गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here