
चिपळूणमध्ये साहित्याचा जागर
पसायदान प्रतिष्ठान , गुहागर व कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर व जितेंद्र आव्हाड युवा मंच , रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय साहित्यजागर दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून लो. टिळक स्मारक येथील बाळशास्त्री जांभेकर सभागृहात होत आहे. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्यिक आप्पासाहेब खोत वारणानगर, संमेलनाध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत देशमुख (माजी अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य संमेलन) हे आहेत या प्रसंगी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लभणार आहे. आ, शेखर निकम दि. बा. पाटील (ज्येष्ठ साहित्यिक सांगली),मा . प्रशांत यादव ( अध्यक्ष ,चिपळूण तालुका काँग्रेस. ),. चंद्रकांत भोजने , युवराज मोहिते(वरिष्ठ पत्रकार)श्रीलङ युवराज माळी आबा पाटील (अध्यक्ष केशवसुत स्मारक समिती मालगुंड) ,प्रा सर्जेराव रणखांब (देगलूर नांदेड)डॉ. प्रशांत पटवर्धन(अध्यक्ष लोटे परशुराम उद्योजक संघटना)रवींद्र मटकर(अध्यक्ष-नमन लोककला,. बापू काणे(ज्येष्ठ9 सामाजिक कार्यकर्ते)नाजीमभाई अफवारे,रऊफभाई वांगडे,व यासीनभाई दळवी इत्यादी प्रमुख मान्यवर आहेत. यावेळी पसायदान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळासंपन्न होणार आहे. यात उमलावे आतुनिच -प्रतिभा सराफ (मुंबई), काही सांगता येत नाही- श्री प्रमोदकुमार अणेराव (भंडारा) आणि अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत : श्री रमझान मुल्ला (सांगली) यांना मान्यवरांच्या हस्ते पसायदान काव्यपुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.याचे स्वरूप रोख रक्कम,सन्मापत्र सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ असे असणार आहे. या वेळी जितेंद्र आव्हाड युवा मंच रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेडणेकर , कोकण मराठी साहित्य परिषद गुहागरचे अध्यक्ष शाहीर शाहीद खेरटकरयांनी सर्व साहित्यप्रेमींना उपस्थित राहवे, असे आवाहन केले आहे.