गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांना घेऊन येणार्या खाजगी गाडय़ांच्या तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ
दोन वर्षानंतर प्रथमच यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याने कोकणात जाण्यासाठी नोकरदार वर्गामध्ये मोठा उत्साह आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधीच सर्व रेल्वे आणि बस फूल्ल झाल्या आहेत. रेल्वे आणि बसचे आरक्षण फूल्ल झाल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आता आपला मोर्चा हा ट्रॅव्हल्सकडे ओळवला आहे. याच संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदारांनी देखील आपल्या तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. ट्रॅव्हलचे दर वाढल्याने चाकरमान्यांना प्रवासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. तर अनेक जण मिळेल त्या वाहनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असल्याचे पहायला मिळत आहेत.
रत्नागिरीला जायचं असल्यास 800 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 1500 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. सावंतवाडीला जायचं असल्यास 1500 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2700 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. राजापूरला जायचं असल्यास 1200 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2000 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात भरमसाठ तिकिटदर आकारुन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुट चालू आहे. हे सर्व उघडपणे चालू असूनही त्याविरोधात राज्य परिवहन विभागाकडून केवळ परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
www.konkantoday.com