वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा, चाकरमान्यांना पोलीसांचे आवाहन
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरीता महाराष्ट्र पोलीसांनी चाकरमान्यांना काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. या पर्यायी मार्गांमुळे प्रवासाचे अंतर थोडे वाढणार असले तरी महामार्गावर होणारी वाहतूक टळणार आहे. पोलीसांनी सुचवलेल्या मार्गाप्रमाणे
कळंबोली ते पळस्पे फाटा मार्ग हे अंतर नेहमीच्या अंतरापेक्षा अडीच किमीने वाढणार आहे.
कळंबोली ते वाकण असा प्रवास केल्यास साडेआठ किमी अंतर वाढणार आहे.
कळंबोलीतून सातारा उंब्रज – पाटण – कोयनानगर – कुंभार्ली घाट – खेर्डी ते चिपळूण असा प्रवास केल्यास हे अंतर 127 किमीने वाढणार आहे.
परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद झाल्यास पिरलोटे चिरणी आंबडस – कळंबस्ते – चिपळूण असा प्रवास करावा लागेल. हे अंतर साडेसात किमीने वाढणार आहे.
कळंबोली ते हातखंबा असा पुणे एक्स्प्रेस वे सातारा- कराड – मलकापूर – शाहूवाडी आंबाघाट – साखरपा – हातखंबा असा प्रवास केल्यास 110 किमी अंतर वाढणार आहे.
कळंबोली ते राजापूर दरम्यान प्रवास करायचा असेल तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सातारा कराड – वाठार – टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर – शाहूवाडी – आंबाघाट- लांजा- राजापूर असा प्रवास करावा. हे अंतर 77 किमीने वाढणार आहे.
कळंबोली ते कणकवलीला जाण्यासाठी पुणे एक्स्प्रेस वे – सातारा – कराड – रंकाळा तलावावरून कळे – गगनबावडा घाट – वैभववाडी कणकवली असा प्रवास करावा लागेल. हे अंतर 55 किमीने वाढणार आहे.
कळंबोली ते सावंतवाडी प्रवास करण्यासाठी पुणे एक्स्प्रेस वे सातारा – कराड – कोल्हापूर – निपाणी – आजरा – आंबोली – सावंतवाडी असा प्रवास करावा लागेल. हे अंतर 35 किमीने वाढणार आहे.
पोलीसांचे नियंत्रण कक्ष तैनात
गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करताना काही अडचणी आल्यास मदतीसाठी पोलीसांनी त्यांच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. त्यामध्ये नवी मुंबई 022-27572298 27574928 27561099, रायगड मोबा 7447711110, 8605494772, फोन.नं. 02141228473, रत्नागिरी – 02352- 222222. सिंधुदुर्ग – 02362- 228200, 228614, महामार्ग पोलीस मुख्य नियंत्रण कक्ष 98334, 9503211100 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूकीला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन व भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू होणार नाही. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती कामासाठी साहित्य आणि मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही
www.konkantoday.com