विनायक नव्हे तर कोकणचा खलनायक- माजी आमदार प्रमोद जठार यांची खासदार राऊत यांच्यावर जोरदार टीका
गेली दहा वर्षे या भागाचे खासदार असलेले विनायक राऊत हे विनायक नाहीत तर खलनायक आहेत कोकणच्या विकासाचे कसे वाटाेळे करायचे व येथील पोराला कसे बेरोजगार करायचे यासाठी अशा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी कुठल्या तरी एनजीओची सुपारी घेऊन विनायक राऊत हे कोकण विकासाचे खलनायक आहेत असा गंभीर आरोप माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे देशाचा व कोकणच्या विकास होऊ नये म्हणून काही कंपन्या व एनजीओ काम करीत आहेत त्यांना खासदार राऊत हे मदत करीत असल्याचा आरोपही जठार यांनी केला आहे रिफायनरी प्रकल्प होणार आहे रिफायनरीचे समर्थन करणाऱ्यांना बरोबर राज्य व केंद्र सरकार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लक्ष घातले असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरीचे नेतृत्व करावे रिफायनरी समर्थक आहेत व विरोधक आहेत त्या लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प उभारावा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार आहे यासाठी देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत व केंद्रीय मंत्री नारायण राणे व अन्य नेत्यांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रातील मंत्र्यांची व अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही जठार यांनी सांगितले
www.konkantoday.com