
रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यावरून बांधकाम मंत्र्यांनी प्रवास केला
रत्नागिरी शहरातील खड्डय़ांबाबत अनेकवेळा नागरिकानी आवाज उठवूनही नगरपरिषदेकडून तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवले जात आहेत त्यामुळे एक पावसाची सर आले तरी परत खड्डे पडत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील खड्डयाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर असलेले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज रत्नागिरी शहरात आले होते मात्र त्यांनादेखील रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रमोद महाजन संकुल च्या जवळ चरामुळे मोठमोठे खड्डे पडले होते भाजपाचे बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण भाजप कार्यालयात येणार असल्याने या परिसरातील खड्डे कालपासून नगरपरिषदेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बुजवण्याचे काम सुरू होते तरीदेखील रत्नागिरी शहरातील इतर रस्त्यांची स्थिती खड्डेमय असल्याने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना रस्त्यावरील खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागला जयस्तंभ परिसर संपूर्ण खड्डेमय झाला असून त्याठिकाणी मोठमोठय़ा पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना अपघात होत आहे आज सकाळी दौर्यावर आलेले रवींद्र चव्हाण या जयस्तंभ परिसरातील खड्डेमय रस्त्यावरुनच मार्गस्थ झाले त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतलेल्या बांधकाम मंत्री आता रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमय रस्त्याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com