मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी झाल्याने अपघातात दोघेजण जागीच ठार ,जखमींना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही पेटली
मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी झाल्याने या अपघातात दोघेजण जागीच ठार झालेतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधत बांदा येथील रुग्णवाहिका बोलवली. मात्र रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली
मिळालेल्या माहितीनुसार, मालवण गोठणे येथील व्यापारी बांदा येथे खरेदीसाठी गेले होते. गणेशोत्सवासाठी होलसेलने फटाके व अन्य सामान घेऊन ते झाराप पत्रादेवी बायपासने मालवण कडे निघाले होते. मळगाव – नेमळे हद्दीवर आले असताना गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून उडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या पलीकडे जाऊन शेतात कोसळली. या अपघातात लोचन पालंडे व संतोष परब यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक आचरेकर व झायलो गाडी चालक आणि विशाल हाटले हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. बांदा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेतून जखमी दीपक आचरेकर व विशाल हाटले यांना उपचारसाठी रुग्णालयात नेत असताना मळगाव रेडकर वाडी येथे बायपासवर अचानकपणे रुग्णवाहिकेला आग लागली. गाडीने पेट घेतल्याने गाडीतून दोन्ही जखमींना तसेच चालक व वैद्यकीय अधिकारी महिला यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अचानकपणे गाडी सुरू होऊन दुभाजकावर जाऊन चढली. त्यानंतर रुग्णवाहिकेने अचानकपणे पेट घेतला. पेट घेतल्यानंतर रुग्णवाहिकेतील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भली मोठी आग लागली. अपघातानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी कोंडी झाली होती.
www.konkantoday.com