बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सुस्तावलेले रत्नागिरी नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले
गेले अनेक दिवस पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही नगर परिषदेकडून तकलादू दुरुस्ती केली जात होती राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले होते त्यांनादेखील शहराच्या रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करावा लागला होता मात्र त्यानंतर सुस्तावलेले नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, जयस्तंभ आदी भागात जेसीबी लावून खरवडून काढत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे का होईना रत्नागिरीतील नागरिकांना खड्या पासून मुक्तता मिळणार असल्याने नागरिकांच्यात समाधान आहे
www.konkantoday.com