राजापुरात आढळले पोलिओ सदृश लक्षणे असलेले बालक; आरोग्य विभाग सतर्क

राजापूर : शहरातील तालीमखाना परिसरातील एका चार वर्षीय बालकामध्ये पोलिओ सदृश (जी. बी. सिंड्रोमची) लक्षणे आढळून आली आल्याने खळबळ उडाली आहे. या बालकावर सध्या कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
खबरदारी म्हणून या बालकाच्या घरापासून शहर व पसिरातील पाच किलोमिटर अंतरावरील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांनी दिली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचेही डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.
राजापूर शहरातील तालीमखाना भागातील हा चार वर्षे चार महिने वयाचा बालक असून तो शहर बाजारपेठेतील एक अंगणवाडीमध्ये शिकत आहे. 8 ऑगस्टपासून त्याला ताप आला होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला शहरातील खासगी डॉक्टरांकडे तपासले, प्रारंभ व्हायरल ताप असेल, असे वाटत असतानाच या बालकाचे हात व पाय दुखण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याला रत्नागिरीतील खासगी रूग्णायात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला कोल्हापूर अथवा मुंबईत हलविण्याचा सल्ला दिला. सर्व पालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलीओ डोस पाजून घ्यावा व आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही डॉ. राम मेस्त्री यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button