
गणेशोत्सवात राजापूर ते कशेडी घाटापर्यंत आरटीओ विभागाची 4 गस्त पथके
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. महामार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून 28 ऑगस्टपासून राजापूर ते कशेडी घाटापर्यंत 4 गस्त पथके नेमण्यात येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. महामार्गावरुन खासगी वाहने, एसटी बसेस, ट्रॅव्हल प्रवास करत असतात. अशा वेळी सुरक्षित प्रवास व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गर्दीच्या हंगामात अपघातांना आळा बसावा यासाठी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून प्रबोधन कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून कशेडी ते राजापूर पर्यंत 4 पथके तयार करण्यात आली आहे.
दि. 28 ऑगस्टपासून महामार्गावर ही पथके सज्ज होतील. संशयित वाहनांची तपासणी होणार आहे.