
रामपूरच्या वैद्यकीय अधिकार्यांविरोधात स्थानिक आक्रमक; आरोग्य विभागाला निवेदन
चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 वर्षापूर्वी कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेल्या डॉ. निकिता शिर्के यांच्या जागी दुसर्या वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती झाली आहे. सदर वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्राबाहेरचे असल्याने त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने ग्रामीण भागातून येणार्या लोकांना उपचारासाठी संवाद साधताना समस्या होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना निवेदन दिले असून याची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी माजी सभापती जितेंद्र चव्हाण, अनुजा चव्हाण, बोरगाव सरपंच सुनील हळदणकर, संदीप घाग, उमरोली सरपंच महेंद्र भडवळकर, प्रितम वंजारे, नरेंद्र निवळकर, सुबोध सावंत, आदित्य आवटे, सुभाष थरवळ, प्रमोद निवळकर, रवींद्र चव्हाण, तुकाराम बहुतुले, सतीश चव्हाण उपस्थित होते.