
ना. उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा दौर्यावर
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शुक्रवारी रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. नागरिकांच्या भेटीगाठींसह बागायतदारांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. चिपळूण येथील आढावा बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीत आल्यावर दुपारी 12 ते 2 वा. जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर दु. 2 वा. आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या जलतरणपटूंचा शासकीय विश्रामगृहात सत्कार करणार आहेत. दु. 3 वा. आंबा बागायतदारांच्या अडीअडचणी अल्पबचत भवनमध्ये समजून घेणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते चिपळूण येथे जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील स्थितीचा आढावाही घेणार आहेत.