
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दोन दिवस कोकण दौर्यावर
रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दोन दिवस कोकण दौर्यावर येत आहेत. शुक्रवारी ते परशुराम घाटासह लांजा, राजापूरमधील रस्त्याचीही पाहणी करणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याबाबत पावसाळी अधिवेशनातही आवाज उठवण्यात आला होता. गणेशोत्सव सात दिवसांवर आलेला असताना या महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंत स्वत: पाहणी करणार आहेत. शुक्रवारी सकाळी रायगडमधून या दौर्याची सुरूवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील महामार्गाची पाहणी करून सायंकाळी ते 5.30 वाजता परशुराम घाटाची पाहणी करून अधिकार्यांशी चर्चा करणार आहेत. रात्री उशिरा ते रत्नागिरीत दाखल होणार आहेत. शनिवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची पाहणी करून ते लांजा-राजापूर मार्गाची पाहणी करणार आहेत.