‘परफेक्ट’ पालक व्हायचंय?
एक जीव जन्माला घालणं आणि त्याला वाढवणं ही खूप महत्वाची जबाबदारी असते. मुलाला उत्तम आरोग्य, शिक्षण देण्यासोबतच त्याच्यावर चांगले संस्कार करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अशावेळी पालक कळत नकळत चुका करत असतात. या चुकांच्या मुलांच्या संगोपनावर खूप मोठा परिणाम होतो. मुलांच संगोपन ही पालकांसाठी खूप मोठी जबाबदारी असते. आपण उत्तम पालक होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. अशावेळी या पॅरेंटिंग टिप्स तुम्हाला मदत.करतील ज्यामुळे तुमच्या मुलावर तर चांगले संस्कार होतीलच. सोबत तुम्ही देखील चांगले पालक बनाल.
मुलांना उत्तम व्यक्ती बनवणं हा तुमचा हेतू असला तरीही तो साध्य होत नाही. अशावेळी या खालील 5 चुका कटाक्षाने टाळा. जेणेकरून तुमच्या संगोपनात कोणतीची कमी राहणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाला उत्तम घडवू शकता. या टिप्स मुलांच्या सायकोलॉजीनुसार अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे संस्कार करत असताना याचा नक्कीच फायदा होईल.
* मुलांनी चिडचीड केली तरी तुम्ही करू नका :
मुलं विचित्र वागली किंवा त्यांनी चिडचिड केली तरी चालेल. पण तुम्ही अजिबात आपला संयम सोडू नका. कारण मुलांची वाढ होतेय. अजून त्यांना चुकीचं आणि बरोबर याची जाणीव नाही. त्यामुळे त्यांनी असं रिऍक्ट होणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही अजिबात त्यांच्यासमोर चुकीचं वागू नका.
* त्यांना शिक्षा अजिबात करू नका :
शिक्षा करणं ही प्रत्येक पालकाची सवय आहे. पण असं अजिबातच करू नका. काहीही झालं तरी मुलाला शिक्षा करायची, पण ही सवय अजिबातच चांगले नाही. कारण यामुळे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. अशावेळी शिक्षा करण्याची सवय सोडा.
* चारचौघात त्यांची मस्करी करू नका :
अनेक पालक आपल्या मुलांच्या स्वभावाची किंवा त्यांच्या वागणुकीची खिल्ली उडवतात. महत्वाची बाब म्हणजे यामागे त्यांचा कोणताच दुसरा हेतू नसतो. पण चारचौघात मुलांवर हसल्यामुळे त्यांच्या मनावर वाईट संस्कार होतात. याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो.
* तुलना करणं बंद करा :
प्रत्येक मुलं हे वेगळं असतं. त्याचा स्वभाव आणि त्याच वागणं हे देखील वेगळं असतं. त्यामुळे मुलांची तुलना करणं बंद करा. पालक म्हणून तुम्ही त्यासंबंधी मुलांशी बोलणं देखील चुकीचं आहे. जसं की, ती बघ कशी वागती? त्या मुलाला हे कळंत, तुला का नाही कळतं?
* कोणत्याच गोष्टीसाठी मुलाला जबाबदार धरू नका :
अनेकदा आपण कळत नकळत मुलांना जबाबदार धरतो. म्हणजे मुलांच्या संगोपनासाठी कधी नोकरी सोडावी लागली किंवा मुलासाठी खास एखादी गोष्ट करावी लागली. तुमच्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. त्यावेळी तुम्हाला मुलामुळे जाता आलं नाही. यासारखे अनेक प्रसंग घडतात. अशावेळी तुम्ही त्यांना अजिबातच जबाबदार धरू नका.