उदय सामंत यांना शिवसेनेची ताकद दाखवून देऊ : खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : शिवसेनेची  काय ताकद आहे हे 2024 ला आम्ही ना. उदय सामंत यांना दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले. रत्नागिरी दौर्‍यावर आलेले रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी  मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद गटामध्ये बैठका घेतल्या. तत्पूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मंत्री सामंत राष्ट्रवादीत असताना आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यावेळी उदय सामंत हे नीलेश राणेंचे सारथ्य करीत होते. त्यांनी आम्हाला आव्हान देण्याची भाषा करू नये, असे खा. राऊत म्हणाले. जनतेचा विश्‍वास शिवसेना व आमच्यावर आहे. आमिष दाखवून शिवसेनेत या, असे सांगण्याची  वेळ आमच्यावर आलेली नाही, असेही ते म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button