
लांजा वाडगावचे ग्रामसेवक शशांक जाधव यांचे निधन
लांजा : तालुक्यातील कोंडगे गावचे रहिवासी, वाडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा लांजाचे सचिव शशांक सुरेश जाधव (वय 41) यांचे गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी चिपळूण डेरवण येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ग्रामसेवक शशांक जाधव हे आजारी होते. चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी 17 ऑगस्ट रोजी त्यांची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. शशांक जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.