भाट्ये समुद्रात बोट बुडून बेपत्ता झालेल्या ओवेस अजूम मक्की या युवकाचा मृतदेह मांडवी बंदराच्या मुखाशी आढळला
रविवारी सकाळी भाट्ये समुद्रात बोट बुडून बेपत्ता झालेल्या ओवेस अजूम मक्की या युवकाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच मांडवी बंदराच्या मुखाशी आढळून आला.तर बुडालेली ‘अल इब्राहिम’ हि बोट सुद्धा सोमवारी सकाळी भाट्ये किनारी लागली. स्थानिकांनी ती पाण्याबाहेर बाहेर ओढून काढली.
राजीवडा येथून ‘अल इब्राहिम’ हि मच्छिमारी बोट घेउन जयगड येथील पाच जण रविवारी सकाळी मिरकरवाडा जेटीवर बोटीच्या दुरुस्तीसाठी जात होते. दरम्यान समुद्रात काही अंतरावर गेल्यावर बोटीची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यात समुद्र खवळलेला असल्याने मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ती नौका उलटली. त्यामुळे बोटीतील पाचही जण पाण्यात पडले. या बोटीपासून काही अंतरावर दोन बोटी होत्या. त्यावरील खलाशांनी चार जणांना सुखरुपपणे पाण्यातून बाहेर काढले. परंतू,ओवेस मककी हा खवळलेल्या समुद्रात बेपत्ता झाला. तर बोट सुद्धा पाण्यात बुडाली होती.
सोमवारी सकाळी,बुडालेली अल इब्राहिम बोट भाट्ये सुरुबन येथील किनारी लागली होती. ही बाब स्थानिकांना समजताच त्यांनी बोट पाण्यातून ओढून बाहेर काढली. तर बेपत्ता ओवेस याचा मृतदेह मांडवी बंदराच्या मुखाशी सोमवारी संध्याकाळी आढळून आला. त्या मृतदेहाला स्थानिक मच्छीमारांनी राजिवडा किनाऱ्यावर आणले आणि त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला
www.konkantoday.com