
कर्नाटक-कारवार बंदरातील वेब रायडर बोया रत्नागिरीकडे येण्याची शक्यता
हैद्राबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अर्थात इनकॉइजमार्फत कर्नाटक-कारवारसमोरील समुद्रात २ कि.मी. दूर सोडलेला वेव्ह रायडर बोया तेथून रत्नागिरीसमोरील ८० कि.मी. दूर समुद्रात स्थलांतरित झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदरचा वेब रायडर बोया पाण्यातून हवेत वरती उचलला गेल्याची प्राथमिक माहिती इनकॉईजला प्राप्त झाली असल्याने हा बोया कुणी चोरीच्या उद्देशाने उचलून तर नेला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. हरवलेला बोया नेदरलँडमधून आणण्यात आला होता. अन्य देशांमध्ये या बोयाची किंमत सुमारे ५० लाख एवढी आहे.भारत सरकार भूविज्ञान मंत्रालयाच्या वतीने हैद्राबाद येथे कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय महासगर सूचना सेवा केंद्राने चार वर्षापूर्वी कारवार समुद्रात सदरील वेव्ह रायडर बोया नांगरला होता. ११ फेब्रुवारी रोजी हा बोया आपली जागा सोडून रत्नागिरीच्या दिशेने गेल्याची माहिती त्यावरील उपग्रहीय यंत्रणेवरून इनकॉईजला प्राप्त झालीय. बोयावरील जीपीएस यंत्रणेद्वारे त्याचे खेरचे ठिकाण १६ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीसमोरील ८० कि.मी. दूर समुद्रात दाखवले गेले आहे. मच्छिमार किंवा अन्य कुणालाही हा वेव्ह रायडर बोया दिसून आला तर त्यांनी संशोधक प्रा. डॉ. बी. जी. भवरे ९८२२६२०४२१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. www.konkantoday.com