चिपळूण नगर परिषद इमारतीच्या सभागृहाचे ‘पीओपी’ छासळले
चिपळूण : नगर परिषदेच्या जोड इमारतीतील मुख्य सभागृहाच्या छताचे पीओपी सुशोभिकरण ढासळण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत दक्षता न घेतल्यास धोकादायक इमारतीच्या वरच्या मजल्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सभागृहाच्या छताला गळती लागली आहे. गळती लागण्याच्या कालावधीपासून आजपर्यंत या जोड इमारतीची देखभाल, दुरूस्ती व निगा राखण्यात आली नाही. केवळ रंगरंगोटीवर लाखो रूपये खर्च करण्यात आले. परिणामी सुमारे तीस वर्षाच्या कालावधीत ही जोड इमारत धोकादायक बनली आहे. त्या मानाने मुख्य जुनी इमारत सुस्थितीत आहे. परंतु धोकादायक इमारतीमुळे मुख्य इमारतीलाही हळूहळू धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.