चिपळूण नगर परिषदेच्या स्फूर्तिगीत गायन स्पर्धेला प्रतिसाद

चिपळूण : नगर परिषदेमार्फत देशभक्तीपर गाण्यांच्या कार्यक्रमासहीत स्फूर्तिगीत गायन स्पर्धा झाली. यामध्ये वैयक्तिक गायन
स्पर्धेत आर्या पोटे तर सामूहिक गायन स्पर्धेत आर. सी. काळे विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. चिपळूण न. प. ने 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान शहरात विविध उपक्रम राबविले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमांना 9 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. सकाळी 7 ते 10 या वेळेत क्रांतिदिनानिमित्त रॅली काढण्यात आली.  14 ऑगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी स्फूर्तिगीत गायनाच्या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. यामध्ये 18 स्पर्धकांनी सहभाग घेतला.  वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत आर्या पोटे, स्नेहा आठवले, आयुष वाजे यांनी अनुक्रमे यश मिळविले. स्वरा यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. समूह गीतगायन स्पर्धेत आर. सी. काळे विद्यालय व आनंदराव पवार विद्यालयाने अनुक्रम यश मिळविले. परीक्षक म्हणून रवी निगुडकर, विजयकुमार जोशी यांनी काम पाहिले तर गायन स्पर्धेसाठी राहूल साडविलकर (हार्मोनियम), दिलीप संकपाळ (तबला) यांची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले. कै. वामनराव साडविलकर मंडळातर्फे कलाकुंज गायन सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सांगता ‘बलसागर भारत होवो’ गीताने करण्यात आली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले.दि. 17 रोजी शाहीर अरविंद जांभळे यांच्या देशभक्तीपर गाण्यांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू साडविलकर, अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, संतोष शिंदे, राजू खातू, संदेश टोपरे, विनायक सावंत, महेश जाधव, वैभव निवाते आदी कर्मचारी व विभागप्रमुखांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button