मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबाबत आमदार राजन साळवी यांची लक्षवेधी
मुंबई येथे चालू पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाबाबत व शेतकर्यांना न मिळालेल्या मोबदल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली.
या लक्षवेधीद्वारे आमदार डॉ.राजन साळवी म्हणाले, गोव्यापासून लांजा वाकेडपर्यंतचे काम पूर्ण झाले असून वाकेडपासून पुढे पनवेलपर्यंत काम राखडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच नागरिकांना वाहतूक कारणे अत्यंत धोकादायक झाले असल्याचे निदर्शनास आणले. तसेच लांजा तालुक्यातील अनेक शेतकर्यांचे मोबदले मिळाले नसून त्याच्या जागेचे मोबदले कधी मिळणार तसेच लवाद व न्यायालयातील खटले पूर्ण कधी होणार आदी बाबी निदर्शनास आणून दिल्या.