मांडवीनजीक बोट बुडाली, चौघांचे प्राण वाचले, एकजण बेपत्ता
रत्नागिरी:- राजीवडा येथून मासेमारीसाठी निघालेली इम्रान सोलकर यांची बोट मांडवी जेट्टी नजीक बुडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या बोटीवरील चौघांना नजीकच्या मासेमारी नौकांनी मदत दिल्याने चौघांचे प्राण वाचले असून एकजण बेपत्ता आहे.
बोटीवरील सर्व खलाशी जयगड येथील असल्याची माहिती मिळत आहे. मत्स्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. अद्यापही समुद्रातील वातावरण खराब आहे. पाण्याला प्रचंड करंट असून अशा वातावरणात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये , असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.