
जयगड येथे जात असताना बुडालेल्या मच्छिमारी बोटीतील खलाशी अद्याप बेपत्ता ,लाटांच्या तडाख्याने बोट बुडाली
कराराने घेतलेली मच्छीमार बोट जयगड येथे नेत असताना आज सकाळी लाटांच्या तडाख्यामुळे बोट बुडाल्याने पाच खलाशी समुद्रात बुडत होते त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे या बोटीवरील खलाशी ओवेस मख्खी अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे
एस इब्राहिम ही बोट जयगड येथे नेण्यात येत होते मांडवी समुद्रात आलेल्या जोरदार लाटांमुळे ही बोट बुडाली बोट बुडत असताना यावेळी समुद्रात असलेल्या इतर बोटीनी बुडालेल्या बोटीवरील खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला बोटीवरील नईम शेख ,उज्जेलामुल्ला,
आपशान मुजावर, एयाज माखजनकर या चार जणांना वाचवण्यात यश आले आहे मात्र अजूनही एक जण बेपत्ता आहे
www.konkantoday.com