चिपळुणात बालिकेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
चिपळूण : शहरातील पेठमाप बुरटेआळी येथे एका चार वर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली. शहरातील पेठमाप बुरटेआळी येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या काव्या विजय बुरटे असे तिचे नाव आहे. चिपळुणात सध्या श्वान त्रासदायक ठरत आहेत. नगर परिषदेने गेल्या दोन वर्षांत भटक्या श्वानांच्या नसबंदीचे नियोजन केले. प्रत्यक्षात किती भटक्या श्वानांची नसबंदी झाली हा संशोधनाचा विषय आहे. मोकाट गुरे व गाढवे यांच्यामुळेही अपघात झाले असून काहीजणांना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. असे असूनही न.प.कडून संबंधितांवर कायदेशिर कारवाई केली नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.